
पहिल्या नोकरीचा आनंद काही औरच असतो. असाच एक भारावलेला क्षण @vansshhiiikaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वंशिका नावाच्या एका मुलीने शेअर केला आहे. जर्मनीमध्ये नोकरी करणारी वंशिका जेव्हा मायदेशी परतते, तेव्हा ती आईला “भेटवस्तू म्हणून काहीही आणलेले नाही” असे सांगत आईची माफी मागते. त्यानंतर लेक एक बॉक्स बाहेर काढते. त्या बॉक्समध्ये दागिन्यांचा एक सुंदर सेट असतो. त्यानंतर ती सोन्याच्या दागिन्यांचा आणखी एक सेट बाहेर काढते. ते पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात. वंशिकाने म्हटले आहे, “आपल्या पालकांना अभिमान वाटायला लावणे आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहणे, या भावनेची बरोबरी जगात कशाशीही होऊ शकत नाही.”




























































