
NEET पेपरफुटी व परिक्षांमधील भ्रष्टाचाराविरोधात लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या 17 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. गेल्या 17 दिवसात वांगचुक यांचे वजन साडे आठ किलोने कमी झाले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र असे असतानाही वांगचुक यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
View this post on Instagram
”सोनम सर हे सध्या खूप त्रासात आहेत. त्यांचे मसल मास कमी होऊ लागले आहे, तसेच त्यांना प्रचंड वेदना होत आहेत. इतरांप्रमाणे मी देखील त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. पण त्यांनी शांतपणे त्यास नकार दिला व म्हणाले, मला उपोषण सोडायला सांगू नका, सरकारला विचारा की चर्चेला का येत नाहीत” असे अभिजीत दिपके यांनी ट्विट केले आहे.
View this post on Instagram






























































