
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंतवाल शहरात गुरुवारी संतापजनक घटना घडली आहे. येथील केएसआरटीसी बस स्थानकावर एका 23 वर्षीय तरुणीची तिच्याच एका दूरच्या नातेवाईकाने कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
फ्री प्रेस जरनलने दिलेल्या वृत्तानुसार, लावण्या असे मृत तरूणीचे नाव आहे. लावण्या कल्लाडका येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये कार्यरत होती. गुरुवारी नेहमीप्रमाणे तिचे काम संपवून ती घरी जाण्यासाठी बंतवाल येथील केएसआरटीसी बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. त्याच वेळी तिचा दूरचा नातेवाईक असलेला आरोपी चेतन तिथे पोहोचला. त्याने येतानाच आपल्या बॅगेत धारदार कोयता लपवून आणला होता.यादरम्यान चेतनने बॅगेतून धारदार कोयता काढला आणि लावण्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी लावण्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधम चेतनने तिचा पाठलाग करून भरचौकात तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेला.
लावण्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान ही हत्या एकतर्फी प्रेमाच्या रागातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Accused Nabbed in Bantwal Murder of 21-Year-Old Woman
Dakshin Kannada
Police in #DakshinaKannada have arrested Chethan, a distant relative accused of murdering 21-year-old Lavanya in Bantwal on Thursday evening.
Superintendent of Police Arun K. said a complaint was filed after… https://t.co/opOMt2KrCs pic.twitter.com/c4ZEQcMKB6
— Yasir Mushtaq (@path2shah) July 17, 2026
आरोपी चेतन हा लावण्यावर एकतर्फी प्रेम करत होता आणि सातत तिच्या मागे असायचा. लावण्याने त्याचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी चेतनला अटक केली आहे. बंतवाल शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्याकांडामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


























































