धामणसे गावात 200 नारळ रोपांचे वितरण, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाने केले तीन वर्षांत 900 झाडांचे संवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत 900 झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात आले आहे. ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब झाडाचा तिसरा वाढदिवस व 200 नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत असताना गावातच झाडांचे जतन करण्याचा वसा घेतल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी दिली.

यावेळी “एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया… एक पुस्तक वाचूया, ज्ञानदीप लावूया” हा संदेश देण्यात आला. यंदा नारळाची रोपे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सरपंच अमर रहाटे, उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी, मेधा कुळकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे, अंगणवाडी सेविका,ओरी गावातील ग्रामस्थ शंतनू देसाई राजेंद्र डाफळे, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.