Pandharpur News – आषाढी वारीसाठी सहा हजार सार्वजनिक शौचालये; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या नैसर्गिक सुविधांसाठी शासनाच्या वतीने सहा हजाराहून अधिक सार्वजनिक शौचालयाची सुविधा उभारली आहेत. मोठ्या संख्येने उभारलेली ही शौचालये दिखावा न ठरता ती भाविकांना सहजतेने वापरा येतात की नाही याची तपासणी जिल्हाधिकारी एन. कार्तिकेन यांनी केली.

वारीच्या निमित्ताने आढावा बैठका घेऊन स्थानिक यंत्रणेला सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र कागदावर केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले आहे का, सुविधा परिपूर्ण आहेत का याची खातरजमा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी वाखरी पालखी तळावरील शौचालयात जाऊन केली.

यावेळी स्वच्छता व पुरेसे पाणी यावर अधिक भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.