बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 45 पाकिस्तानी सैनिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी स्वतंत्र देश म्हणून घोषणा करणाऱ्या बलुचिस्तानने पाकिस्तानी लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला केला असून त्यात पाकिस्तानचे 45 सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मस्तंग जिल्ह्यात क्वेट्टा-कराची महामार्गावर हा हल्ला करण्यात आला. दोन आठवड्यांत पाकिस्तानी सैनिकांवर तिसऱ्यांदा मोठा हल्ला झाला आहे. हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वीकारली आहे. लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या हल्ल्याची माहिती दिली.