
लग्नाळू मुले एखादे चांगले स्थळ मिळावे यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. पुण्यात एका तरुणाने लग्नासाठी रस्त्यावर बॅनर लावलेत. याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या पठ्ठय़ाने केट पाटील चौकात मोठं पोस्टर लावलंय. पोस्टरवर स्पष्टपणे लिहिलंय की, त्याचं वय 30 आहे. महिन्याला 25 हजार रुपये कमावतो. पुढे लिहिलंय की, त्याच्याकडे ना स्वतःची कार आहे, ना घर. तसेच शेतीसुद्धा नाहीये. जर कुणाच्या नजरेत सुंदर आणि चांगली मुलगी असेल तर नक्की सांगा. लग्नासाठी वधू शोधण्याची ही भन्नाट कल्पना पाहून लोकही मजेशीर कमेंट्स करीत आहेत. काही म्हणाले की, मुलगा फारच इमानदार आहे. हा व्हिडीओ इन्स्टावर ‘life.with_vedanti.rakesh’ नावाच्या पेजवर पोस्ट केलाय. या व्हिडीओला लाखो ह्यूज मिळाले असून 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे.
































































