जेन झी नी सरकारच्या झिंज्या उपटल्या – राज ठाकरे; शिवतीर्थावर उद्या विजयाचा जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. जेन झी नी सरकारच्या झिंज्या उपटल्या आणि त्यांना जमिनीवर आणलं. उद्या या सर्व तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी जल्लोष आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हा तरुणांचा मोठा विजय आहे. यात दीपकेंचा खूप मोठा वाटा आहे. कुठल्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली, एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय. त्याचा जल्लोष होणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून उद्या सर्वजण शिवाजी पार्कवर जमतील, असे राज ठाकरे म्हणाले.

हा जो राग आहे तो आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेला आहे. यापुढे जे निर्णय आहेत ते अभिजीत दीपके घेतील आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. त्यांनी या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. ते ज्या प्रकारे निर्णय घेतील त्याला देशातील तरुण पाठिंबा देतील, असे राज ठाकरेंनी पुढे म्हटले.

नीटचा पेपर फुटणे ही पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही. 21 मुलं आत्महत्या करतात हे पाप त्यांच्या डोक्यावर आहे. 2017-18 मध्ये मी प्रेस घेऊन सांगितलं होतं, मोदींना पण हे सांगितलं होतं की आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतील.

ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कोणाकडून तरी गुन्हा घडला. पण जबाबदारी म्हणून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. यांनीही तेव्हाच द्यायला पाहिजे होता, इतका वेळ लावायची गरजच नव्हती. हे प्रकरण इतकं ताणलंच नसतं गेलं. पण आम्हाला कोण काय करणार? हे जे आहे हे या सर्व तरुणांनी सर्वांना रस्त्यावर आणलंय.

शिक्षकांनाी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते मग दिल्ली पोलिसांवर का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच महाराष्ट्रातील आंदोलनादरम्यान मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांचे आभार राज ठाकरे यांनी मानले.