
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली. वैभव सूर्यवंशीने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत कमालीची कामगिरी केली. त्याच्या याच दमदार कामगिरीच फळ म्हणजे त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. 15 वर्षांचा वैभव आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे
वैभवने या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 151 धावा करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून मान पटकावला. पहिल्या सामन्यात अवघ्या 18 चेंडूंत 50 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या वैभवने, अखेरच्या सामन्यात संथ खेळपट्टीवर जबाबदारीने खेळत 49 चेंडूंमध्ये 81 धावांची मॅच-विनिंग खेळी केली. त्याच्या या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेत खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते, मात्र निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. झिम्बाब्वे दौऱ्यात या युवा खेळाडूने मिळालेल्या संधीचे सोने करत आपले स्वप्न पूर्ण केले आणि टीम इडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.




























































