
‘एमपीएससी’ मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरण मुंबईतील विशेष पोलीस पथकाने मंगळवारी नंदुरबारमध्ये छापेमारी केली. संशयित कौटिल्य कॅडमीचा संचालक, तक्रारदान यांच्यासह सर्व संबंधित गायब् असल्याने या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले.
मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने संशयित कौटिल्य अ कॅडमीत जावून माहिती घेतली. अ कॅडमीचा संचालक प्रवीण पाटील पेपरफुटीचा तक्रारदार गौरव पाटील हे गायब असल्याने या पथकाला ठोस माहिती मिळू शकली नाही एका विद्यार्थिनीच्या घरी जावून त्यांन माहिती घेतली. काहीही आक्षेपाह कागदपत्रे मिळाली नाहीत. कुणीह भेटले नसल्याने तपासासारखे काहीच हाती लागले नाही, असे या पोलीस पथकाने सांगितले.



























































