भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार? स्वत:च दिली कबुली, काय म्हणाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 2022 पासून देशासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारची धारधार गोलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळते. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र, यावर स्वत: भुवनेश्वर कुमारने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

भुवनेश्वर कुमारने RCB पॉडकास्टच्या एका भागात स्पष्ट केलं की, आता टीम इंडियामध्ये पुनरागमन करणे हे त्याचे उद्दिष्ट राहिलेले नाही. तो 2022 पासून देशाकडून खेळलेला नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या बदलाचा त्याने कोणताही पश्चात्ताप न बाळगता स्वीकार केला आहे. सध्या तो केवळ खेळाच्या प्रेमाखातर आणि आयुष्यात समतोल साधण्यासाठी क्रिकेट खेळत आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे शांत आणि समाधानी असल्याचे भुवनेश्वरने सांगितले. त्याच्या घरी कधीही क्रिकेटवर किंवा निवडीवर चर्चा होत नाही.

हिंदुस्थानचा एफ-57 गोळाफेकमध्ये ऐतिहासिक दुहेरी धमाका; सोमन राणाची ‘सुवर्ण’फेक, शुभम जुयालला रौप्य

आरसीबीकडून खेळताना आयपीएल 2026 मध्ये 28 विकेट्स घेणाऱ्या भुवनेश्वरने, आयपीएलमुळे हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीला मिळालेल्या बळाचे कौतुक केले. तसेच, विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या काळात हिंदुस्थानच्या परदेशी दौऱ्यांच्या तयारीसाठी घरच्या मैदानांवरही वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या, ज्याचा मोठा फायदा झाला. मेरठमधील आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढताना त्याने टीम इंडियाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार आणि आपल्या प्रशिक्षकांचे आभार मानले. लहानपणी त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि निरीक्षणातूनच आपले गोलंदाजीचे पाया भक्कम झाल्याचे त्याने सांगितले. तो सध्यातरी देशांतर्गत क्रिकेट, यूपी टी-20 लीग आणि आयपीएलमध्ये खेळणे सुरूच ठेवणार आहे.