
कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्या अखेरीस प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे मुंबई – मडगाव दरम्यान चार विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबे देण्यात येतील.
गाडी क्रमांक 01029 विशेष गाडी 13 ऑगस्ट 2026 आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 00.25 वाजता सुटेल. मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी 15.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01030 विशेष गाडी 13 ऑगस्ट 2026 आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी मडगाव येथून सायंकाळी 16.00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 03.45 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01029 चे आरक्षण 8 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल.


























































