
डबघाईला गेलेली कंपनी, डोक्यावरचं वाढतं कर्ज, कुटुंबाची जबाबदारी यामुळे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी यांना एकेकाळी चक्क सीग्रेड सिनेमामध्ये काम करावे लागले होते. सुश्मिता यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओमधून त्यांनी ही माहिती दिली आहे.
कर्जात बुडाल्याने C ग्रेड सिनेमात करावे लागले होते काम, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी यांनी दिली धक्कादायक माहिती pic.twitter.com/TQ8X356Ue3
— Saamana Online (@SaamanaOnline) August 6, 2026
‘गोलमाल’ फेम अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी यांनी आयुष्यातील या आव्हानात्मक काळात केलेल्या व्यावसायिक निवडींबाबत या व्हिडीओतून सांगितले. एकदा मला विचारण्यात आले होते की मॅडम, तुम्ही वाईट चित्रपटांमध्ये का काम केले?’ हा प्रश्न ऐकून मला धक्काच बसला. कारण माझ्या आयुष्यातील त्या टप्प्यावर मागे जाऊन विचार करणे खूप त्रासदायक आहे की, ‘मी अशा सी-ग्रेड, सेक्सिस्ट चित्रपटांमध्ये काम का केले? मी त्यावेळी माझ्या मजबुरीमुळे मी माझा आत्मा विकला. 2002 साली माझी व माझ्या मिस्टरांची एक मीडिया कंपनी होती. ती डबघाईला गेली होती. आमच्यावर जवळपास 1 कोटींचं कर्ज होतं. त्यावेळी टेक्नॉलॉजीचा एक वेगळा काळ आला होता. त्यामुळे आमची कंपनी डबघाईला गेलेली. कर्जाचे हफ्ते डुबत होते, घरी वसूली करणारी लोकं येत होती. शिव्या द्यायचे, खूप वाईट काळ होता तो” असे सुश्मिता यांनी सांगितले.
या सगळ्या परिस्थितीमुळे मी त्या चित्रपटांमध्ये काम केले. मी आणि माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत केली व ते कर्ज फिटवले. माझ्या मुलांना मी परदेशात शिकायला पाठवले त्यासाठी मला पैसे हवे होते. माझा एक मुलगा ऑस्ट्रेलियात आहे आणि एक न्यूझीलंडमध्ये शिकायला गेले. त्यामुळे मला अशी कामं करावी लागली. मी खूप घाणेरडी कामं नाही केली पण मी जे काही केले त्याचा मला काही अभिमान नाही”, असे सुश्मिता यांनी सांगितले.




























































