संगमनेरमध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवदाम्पत्यासह मित्रांना मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमविवाहाचा राग मनात धरून मुलीच्या घरच्यांनी नवदाम्पत्यासह त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मारहाण केल्यानंतर मुलीला तिच्या घरच्यांनी बळजबरीने गाडीत घालून घरी नेले. याप्रकरणी प्रियकर महेश बबन शिरसाठ याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि मानसी यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी आळंदी येथे मित्रांच्या साक्षीने विवाह केला. विवाहानंतर ते गावाकडे परतत असताना मानसीच्या कुटुंबीयांनी दिल्ली नाक्यावर त्यांचे वाहन अडवून तोडफोड केली. तसेच नवदाम्पत्य व त्यांच्या मित्रांवर हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि दगडाचा वापर करत हल्ला केला. यानंतर मुलीला सोबत घेऊन गेले.

या प्रकरणी जगदीश आहेर, आर्यन आहेर, दर्शन आहेर, तेजस आहेर तसेच चेतना नगर नाशिक येथील अन्य तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.