
सनी निम्हण यांच्या पुढाकाराने व सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने आणि झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य लढतीत अव्वल मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने संघर्षपूर्ण विजयासह आपली आगेकूच कायम ठेवली.
उदयोन्मुख ठाण्याच्या कुणाल राऊतने त्याला पहिला सेट 23-9 असा एकतर्फी हरवून सामन्यावर आपली छाप पाडली होती; परंतु संयम राखत अनुभवाच्या जोरावर अभिजितने दुसरा सेट 13-2 असा जिंकला व सामना बरोबरीत आणला. तिसऱया व अंतिम सेटमध्ये अभिजितने आपला खेळ अधिक आक्रमक केला व 25-11 असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या रहिम खानवर मात केली. हा सामना तीन सेटपर्यंत रंगला. या सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या रहिमवर 23-8, 10-16, 25-0 असा विजय नोंदवला.



























































