…तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, के. सी. वेणुगोपाल यांचा अमित शहांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतर येथे 20जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या, लाठ्यांना खिळे ठोकून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पेलेट गनचा वापर करण्यात आला या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे, आमची भूमिका अत्यंत स्पष्ट असल्याचे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज मुद्द्यावर अमित शहा जोपर्यंत संसदेत निवेदन देत नाहीत, तोपर्यंत त्यांना संसदेत कामकाज करू दिले जाणार नाही असा इशारा वेणुगोपाल यांनी एएनआयशी बोलताना दिला.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज मुद्द्यावर आमची भूमिका अत्यंत स्पष्ट असल्याचे सांगत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येऊन 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटनांवर स्पष्ट निवेदन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे वेणुगोपाल म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा जोपर्यंत या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर संसदेत निवेदन देत नाहीत, तोपर्यंत त्यांना संसदेत कामकाज करू दिले जाणार नाही, असा इशारा काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, महिला आरक्षण विधेयक , सीमांकन विधेयक आणि एफसीआरए विधेयक यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत सुरू असलेल्या डेडलॉक संदर्भात ही आक्रमक भूमिका मांडण्यात आली आहे.