
विविध माध्यमांतून उत्पन्नवाढीचा प्रयत्न करणाऱया मध्य रेल्वे प्रशासनाला भंगार विक्री चांगलीच फायदेशीर ठरली आहे. रेल्वे प्रशासनाने 5 ऑगस्टपर्यंत केलेल्या भंगार विक्रीतून तब्बल 202.55 कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले. विक्रमी वेळेत हा टप्पा गाठला. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत उत्पन्नात 76.94 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली. भंगार विक्रीतून 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची मध्य रेल्वेची ही आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. विविध प्रकारच्या भंगार आणि टाकाऊ साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून रेल्वे प्रशासनाने उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट साध्य केले.



























































