Crime news – डिजिटल अटक करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका मनी लाँडरिंग गुन्ह्यात तुमच्या आधार कार्डच्या नंबरचा वापर झाल्याचे सांगत नागरिकाला डिजिटल अटक करून त्यांच्याकडून एक कोटी 67 लाख 40 हजार रुपये उकळले. पण सायबर पोलिसांनी कारवाई करत हा कांड करणाऱ्या सात जणांना पकडून विविध बँक खात्यांतील 34 लाखांची रोकड गोठवली.

हसमुख (नाव बदललेले) यांना त्यांच्या मोबाईलवर दोन अज्ञात क्रमांकांवरून संपर्क साधण्यात आला. कॉलरने स्वतःची ओळख पोलीस अधिकारी अशी दिली. त्यानंतर एका मनी लाँडरिंगच्या प्रकरणात तुमचे नाव आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या नावाचे बनावट कागदपत्र पाठवत भामटय़ांनी त्यांना डिजिटल अटक केली. मग दोन वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर हसमुख यांना एक कोटी 67 लाख 40 हजार पाठविण्यास भाग पाडले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत गुह्यातील एक कोटी 17 लाखांची रोकड स्वतःच्या बँक खात्यावर स्वीकारणारे जगेश्वर महतो आणि जाहीर हुसैन या दोघांना झारखंडमधून तर सीम कार्ड व कॉल रूट करण्याचे काम करणारे नौशाद अली आणि मोहम्मद सैफी या दोघांना मुठीत तसेच गुन्ह्यातील 50 लाख 60 हजारची रोकड काढून घेणाऱ्या एका महिलेसह ऋषी मिना या दोघांना अंधेरीत पडले. शिवाय आरोपींना सीम कार्ड व ओटीपी पुरविणारा संजय शहा याला वाशी येथून अटक केली.