
कोलंबियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. कोलंबियाची राजधानी बोगोटा याच्यासह देशातील अनेक भागांमध्ये हे धक्के जाणवले.
युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची सुरुवातीची तीव्रता ७.४ इतकी मोजण्यात आली आहे. तसेच या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली ११५ किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपाचे धक्के राजधानी बोगोटामध्येही जाणवले असून, अनेक भागांतून धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, ‘कोलंबियन जिओलॉजिकल सर्व्हिस’ने या भूकंपाची सुरुवातीची तीव्रता ६.७ इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या प्राथमिक आकडेवारीमध्ये भूकंपाच्या तीव्रतेबाबत तफावत दिसून येत आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

























































