
पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे चाकण एमआयडीसीमधील उद्योगांनी इतरत्र स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकार आणि उद्योगमंत्र्यांची त्यांना थांबवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. आयटी पार्क म्हणून ख्याती असलेल्या हिंजवडीतील उद्योगांचीही तशीच अवस्था होण्याची शक्यता असून तेथील पायाभूत सुविधांकडे सरकारने लक्ष न दिल्यास हिंजवडीतील उद्योगही स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतील, असा सावधगिरीचा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. चाकण एमआयडीसी आणि तेथील पायाभूत सुविधांच्या समस्यांप्रमाणेच हिंजवडीलाही दीर्घकाळ रेंगाळलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प, अत्यंत खराब रस्ते, वाहतूककाsंडी आणि खराब कनेक्टिव्हिटी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. खासगी पंपन्या गुंतवणूक करतात एका राज्यात आणि आपल्या व्यवसायात… हे अपेक्षित नसते की त्यांनीच रस्ता वगैरे नीट करावा. जे त्यांना आता भाजपच्या राजवटीत करावे लागतेय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
उद्योगांनी अशा समस्यांमुळे स्थलांतरणाचा निर्णय घेऊ नये म्हणून केवळ घोषणांची नव्हे तर त्वरित हस्तक्षेपाची आणि थर्ड-पार्टी ऑडिट करून वेळेत पूर्ण होणाऱ्या नियोजनबद्ध आराखडय़ाची गरज आहे, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नवीन उद्योगांच्या स्वागतासाठी ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ चांगले आहे, परंतु एकदा का आयटी पार्क किंवा उद्योग स्थिरावले की महाराष्ट्रातील प्रशासन त्यांना भ्रष्टाचार, जाचक अटींचे पालन आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त करून सोडतेय, असेही आदित्य ठाकरे यांनी सुनावले.
मंत्र्यांना खराब रस्त्यांवरून फिरवा
आदित्य ठाकरे यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनीही सरकारवर टीकास्त्रs सोडली आहेत. एका नेटकऱ्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टरमधील पह्टो शेअर करत सतत हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड प्लेनने फिरणाऱ्या मंत्र्यांना चाकण, हिंजवडीतील रस्त्यांवरून फिरवा, असा संताप व्यक्त केला आहे. अक्षय भानुशाली यांनी एकदा ठाण्याच्या घोडबंदर रोडवर फेरफटका मारून यावे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी घोडबंदर रोडवरील भयानक ट्रफिककडे लक्ष वेधले.































































