
मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दीर्घकालीन आणि निष्कलंक उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे नागरगोजे यांचा गौरव झाला आहे. नागरगोजे यांना आतापर्यंतच्या सेवा कालावधीमध्ये १५० पारितोषिके आणि ४० प्रशंसापत्र मिळालेले आहेत. तसेच २०२५ मध्ये राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्कार, दिल्ली येथे महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशिप अवॉर्ड्स पुरस्कार आणि यंदा कोकणदीप गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.


























































