केंब्रिजच्या कृष्णवर्णीय प्राध्यापकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडन इंगलंडच्या फैसि विद्यापीठातील सर्वांत तरुण कृष्णवर्षीय प्राध्यापक जेसन आर्डे यांचा अवध्या ४१ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. दक्षिण लंडनच्या बँटरसी पेथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आहळले. रुग्णवाहिका पथकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मृत्यू झाला. जेलन आर्डे यांनी ५ ऑगस्ट रोजी केंब्रिज विद्यापीठातून राजीनामा दिला होता.

रेल्वे विभागात ३९९३ जागांची मेगाभरती
रेल्वे बोर्डात ज्युनिअर इंजिनीअर आणि देपो मटेरियल सुपरिंटेंडंटसह ३ हजार ९९३ पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२७रोजी उमेदवारांचे वय १८ ते २२ वर्षांपर्यंत असायला हवे.

कॉम्प्रेसर पाईपमुळे तरुणाचा जीव गेला
अंगावर पडलेली चूळ आणि कचरा साफ करण्यासाठी औद्योगिक हवेच्या कॉम्प्रेसरचा वापर करणे एका २० वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतले. कम्प्रेिसरचा पाईप तोंडात घरल्यामुळे हवा शरीरात गेल्याने गंभीर इजा झाली. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोनू हरेराम असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

अमेरिकेतील विद्यापीठात गोळीबार
अमेरिकेच्या व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जण जखमी झाले. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच ही घटना घडल्याने संपूर्ण विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण कॅम्पसमध्ये लॉकडाउन लावले आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.