पालिका मुख्यालयात एआय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा, ८७ कॅमेरे बसवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पालिकेच्या फोर्ट येथील मुख्यालयात आता एआय आधारित अत्याधुनिक ८७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेत येणाऱ्या अभ्यागतांवर आता तीक्ष्ण नजर राहणार आहे.

पालिका मुख्यालयातील जुन्या इमारतींमध्ये सध्या वापरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे जुने झाल्याने नवीन कॅमेरे बसवताना सुरक्षा उपाय अधिक सक्षम करण्याकरिता एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

ज्यामुळे रिअल टाईम धोका ओळखणे, चेहऱ्याची ओळख पटवणे आणि स्वयंचलित सूचना आणि इशारा आदी गोष्टींची माहिती मिळणार आहे. यासाठी ४१ एआय डोम कॅमेरा, ४४ एआय बुलेट कॅमेरा आणि २ पीटीझेड अशा प्रकारे ८७सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी विविध करांसह ३.७४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

याकरता सहोरा कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरे बसवल्यानंतर पुढील चार वर्षांच्या देखभालीचा समावेश आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये हे कॅमेरे बसवले जाणार आहेत.