होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेचा भूभाग; ट्रम्प यांची एकतर्फी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंगजंग पछाडूनही इराणला नमवू न शकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुरापती सुरूच आहेत. ट्रम्प यांनी आता होर्मुझ सामुद्रधुनीवर दावा केला आहे. होर्मुझचा नकाशा सोशल मीडियावर शेअर करत हा अमेरिकेचा नवा भूभाग असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सामंजस्य करारात मान्य केल्यानुसार अमेरिकेने आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. इ राणच्या बंदरांभोवतीची नाकेबंदी अमेरिका उठवत नाही, तोपर्यंत होर्मुझ बंदच राहील, असे इराणने ठणकावले आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी होर्मुझवर दावा करून इराणला डिवचले आहे.