मेट्रोच्या कामामुळे हटवलेले वरळीतील बस थांबे पुन्हा सुरू, शिवसेनेमुळे प्रवाशांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आले असून वरळी नाका डॉ. ई-मोजेस रोडवरील मेट्रोच्या कामादरम्यान हटवलेले बेस्ट बस थांबे पुन्हा बसविण्यात आले आहेत.

वरळी नाका डॉ. ई-मोजेस रोडवरील गीता चित्रपटगृह आणि भीम नगर येथील बस थांबे मेट्रोच्या कामामुळे हटवले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाले तरी बस थांबा सुरू केला नव्हता. यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवत हे दोन्ही बस थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.