
अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांगलादेशी आरोपीने आज न्यायालयात गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवली. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने गुन्हा कबूल करून न्यायालयाकडून दया दाखविण्याची मागणी केली आहे. जानेवारी 2025 साली वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली इस्लाम याला अटक करण्यात आली होती.
आरोपीने काल शुक्रवारी सत्र न्यायालयात आपल्याला गुन्हा कबूल करायचा असून शिक्षा सुनावताना न्यायालयाने आपल्याबाबत सहानुभूतीचा विचार करावा, अशी विनंती करणारा अर्ज वकील विपुल दुशिंग यांच्या मार्फत दाखल केला. न्यायालयाने या अर्जावर सरकारी पक्षाला उत्तर दाखल करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.






























































