
राज्य सरकारने आज 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये डॉ. अपूर्वा बासुर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग तर रवींद्र खेबुडकर यांची बदली भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए), पुणे; गजेंद्र बावणे व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर; विशाल खत्री मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ; डोनुरू अनन्या रेड्डी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू; पी.के. सिद्धार्थ रामकुमार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार; कुश मोटवानी उपविभागीय अधिकारी, वर्धा; आकाश वर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी; नंदला साईकिरण सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा; योगेश कुमार मीना सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव; शिवांश सिंह प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.



























































