मोहित जैन ‘एबीसी’च्या अध्यक्षपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड (बीसीसीएल) चे प्रकाशन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य मोहित जैन यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्स (एबीसी) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. २०२६-२७ या वर्षासाठी ही निवड असेल. मोहित जैन यांना मुद्रित माध्यम क्षेत्राचा दोन दशकांहून अधिक अनुभव असून त्यांनी आजवर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पब्लिशर्सच्या ग्लोबल सुपरव्हायजरी बोर्डावर त्यांनी तीन वर्षे काम केले आहे. सध्या ते इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशनच्या दक्षिण आशिया विभागाच्या मंडळाचे उपाध्यक्ष असून पीएचडीसीसीआय, सीआयआय, फिक्की या संस्थांवरही कार्यरत आहेत.