
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ यांच्या वतीने विभागातील महिलांसाठी आयोजित केलेला ‘आवळा नवलाईचा मंगळागौरीचा’ हा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी नेसून फुगड्या, झिम्मा, मंगळागौरीचे पारंपरिक खेळ व सांस्कृतिक सादरीकरणे केली.
विभागप्रमुख संतोष शिंदे व विभाग संघटक युगंधरा साळेकर यांनी महिला विभागाच्या सहकार्याने या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना उपनेत्या, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, माजी विभाग संघटक माई परब, जया गोलथळे, जयश्री बळळीकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, शिवाजी रहाणे, विधानसभा प्रमुख अरुंधती दुधवडकर, पल्लवी सपकाळ, गायत्री आवळेगावकर, माजी नगरसेविका मीनल जुवाटकर, विशाखा पेडणेकर, हेमा शेटे, संपत ठाकूर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बाळा अहिरेकर, वैभव मयेकर, संतोष घरत, दिलीप करंदेकर, प्रकाश मिसाळ, युवासेनेचे पायल ठाकूर, शुभदा कोळी, विशाल कापाडीया, अजिंक्य धात्रक, विकास अडूळकर, शुभम शिंदे, यश काते यांनी विशेष मेहनत घेतली.

























































