
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन रविवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. यानिमित्त शिवतीर्थावर माँसाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार असून सकाळी 7 वाजल्यापासून भक्तिगीत, सुगम संगीत, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतीर्थ येथे श्री सिद्धिविनायक सुगम संगीत चमूचे गुणी कलाकार रविराज नर यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 8 ते 11 या वेळेत होईल. यानंतर दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ आणि आर्यदुर्गा महिला भजन मंडळ यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत होईल. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक राजा कदम, स्मिता तायशेटे, सुदेश पवार गायन सादर करणार आहेत.
रमाधाममध्ये भजन, कीर्तन
खोपोली येथील रमाधाममध्ये माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रमाधामचे चंदूमामा वैद्य यांनी दिली.



























































