अबू सालेम 2030 पर्यंत तुरुंगातच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. 25 वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केल्याच्या आधारावर सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे सालेमला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याला 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून हिंदुस्थानात आणले होते. आपल्याला 25 वर्षांपेक्षा जास्त काळाची शिक्षा देण्यात येणार नाही, असे आश्वासन हिंदुस्थान सरकारने प्रत्यार्पणावेळी दिल्याचा दावा सालेमने केला होता. तो जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस संदीप मेहता यांच्या खंडपीठाने फेटाळला.