आज गिरगावातून थेट कोकणात बससेवा, गणेशभक्तांसाठी शिवसेनेचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीने एसटी बस सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाते. यंदाही उद्यापासून म्हणजेच 11 आणि 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता या एसटी बसेस गिरगावच्या डॉ. भडकमकर मार्गावरील शिवसेना शाखा येथून रत्नागिरी, राजापूर व सावंतवाडीला रवाना होणार आहेत.

गेली 23 वर्षे शिवसेनेचे माजी आमदार अरविंद नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या, शुक्रवारी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई तसेच दक्षिण मुंबईतील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक, माजी आमदार अरविंद नेरकर आणि यशराज नेरकर यांनी दिली.