
हिंदुस्थानी वंशाची तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे रेल्वे रुळावर बसले असताना रेल्वेने दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे. मलायका असे या तरुणीचे नाव असून नवम असे तिच्या मित्राचे नाव आहे. ही घटना न्यूयॉर्कमधील लोअर मॅनहॅटन येथील स्प्रिंग स्ट्रीट सबवे स्टेशनवर घडली. मात्र, ते दोघे रुळांवर नेमके कसे पोहोचले? अपघात आहे की आत्महत्या? याचा तपास आता अधिकारी करत आहेत.


























































