
तामीळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मंगळवारी चेन्नईत विस्तारित पेरुंथलैवर कामराजर मोफत ब्रेकफास्ट योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून नाश्ता केला. गांधी ग्रामममधील सरकारी माध्यमिक शाळेत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यापूर्वी या योजनेचा लाभ इयत्ता 1 ते 5च्या विद्यार्थ्यांना मिळत होता. आता इयत्ता 6 वी ते 8 वीचे विद्यार्थीही या योजनेच्या कक्षेत आले आहेत.


























































