चेहरा दाखवा अन् थेट विमानतळात प्रवेश मिळवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिजीयात्रा सुविधेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून आता प्रवेशद्वारावर बोर्डिंग पास स्कॅन करण्याची गरज राहणार नाही. डिजीयात्रासाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांना चेहरा ओळखीद्वारे थेट विमानतळात प्रवेश मिळणार आहे. एमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळावरील सर्व डिजीयात्रा-सक्षम प्रवेशद्वारांवर ‘सिंगल-स्टेप फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञान सुरू केले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील एक टप्पा कमी झाला असून प्रवाशांना अधिक सुलभ आणि संपर्परहित अनुभव मिळणार आहे.