
कायमस्वरूपी शांतता करार किंवा इराणचा नायनाट हेच सध्या माझ्यासमोर दोन पर्याय आहेत. यापैकी कोणता पर्याय जवळ करायचा याचा विचार मी करत आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर केले.
इराणवर केलेल्या हल्ल्यांचे ट्रम्प यांनी यावेळी समर्थन केले. ‘इराण हा दहशतवाद पोसणारा देश आहे. करार करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी त्यांना संधी दिली. पण त्यांचा आडमुठेपणा कायम आहे. इराण जोपर्यंत अणुहट्ट सोडत नाही, दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत त्याच्यावर दबाव कायम राहील. इराणला एकाकी पाडण्यासाठी जगाने अमेरिकेची साथ द्यावी, असे आवाहन ट्रम्प यांनी केले.



























































