
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यात 75 टक्के नव्हे, तर 99 टक्के दुष्काळ पडला असल्याचा दावा करत शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी तातडीने द्या अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांपैकी 99 टक्के आश्वासने पाळलेलीच नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. महायुती सरकार आता केवळ घोषणा करत आहे. या काळात ज्या शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही पटोले यांनी केला. दुष्काळग्रस्त सर्व भागांचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी देत त्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.




























































