
देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा आहे. मागील वर्षभरात तब्बल 3 लाख 89 हजार 700 पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. यामध्ये 91 देशांतील 20 हजार 939 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. त्यामुळे ताडोबाची लोकप्रियता केवळ देशांतर्गत नव्हे, तर जागतिक पातळीवरही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबा म्हणजे केवळ वाघांचे जंगल नाही, तर विविध वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक अधिवासाने समृद्ध असलेला जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहे.
18 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर हल्लेखोर वाघीण जेरबंद

वर्धा जिह्यातील पवनगाव पंचक्रोशीत धुमाकूळ घालणाऱया वाघिणीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडणाऱया वन विभागाला तब्बल 18 दिवसांनंतर अखेर यश आले. शेतकऱयावरील हल्ल्यापाठोपाठ सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोघांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर हल्लेखोर वाघीण वनविभागासाठी आव्हान ठरली होती. शेवटी वन विभागाच्या पथकाला या वाघिणीला पकडण्यात आज मोठे यश आले आहे. या प्रकरणी थेट वनमंत्र्यांना साकडे घालण्यात आले होते.
























































