
पश्चिम उपनगरातील नशेबाजांना विकण्यासाठी आणलेले एक कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीचे 691 ग्रॅम वजनाचे हेरॉईन ड्रग पोलिसांनी पकडले. हे ड्रग्ज घेऊन आलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली.
बोरिवली पश्चिमेकडील खोदीयार सर्पल परिसरात एक व्यक्ती ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची खबर कांदिवली अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार तेथे आलेल्या व्यक्तीला पकडले. त्याच्या सॅक बॅगची झडती घेतली असता त्यात 691 ग्रॅम वजनाचे हेरॉईन, ड्रग्ज मिळून आले. हे ड्रग्स त्याने पुठून आणले होते आणि ते कोणाला विकणार होता याचा पोलीस शोध घेत आहेत.




























































