
खासगी रुग्णालयांकडून होणाऱया रुग्णांच्या लुटीवर सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा संताप व्यक्त केला. कर्कपरोगावरील 2700 रुपयांचे औषध 27 हजार रुपयांना विकणे म्हणजे भीषण नरसंहारच आहे, अशी संतप्त टीप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व औषधांवर समान 16 टक्के मार्जिन ठेवण्याबाबत पावले उचलण्याची सूचना केली.
न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर औषधांच्या किमतींवरील नियंत्रणासंदर्भातील याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी न्या. मेहता यांनी केंद्र सरकारला खंडे बोल सुनावले. ते म्हणालो, कार्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाही. अगदी मृतदेहसुद्धा ते बाहेर आणू देत नाहीत. याबाबत फार्मा क्षेत्राला काहीही पडलेली नाही. ड्रग्स प्राइस कंट्रोल ऑर्डरमध्ये अत्यावश्यक आणि गैर अत्यावश्यक औषधांमध्ये भेद का केला जातो, असा सवाल न्या. मेहता यांनी केंद्र सरकारला केला.
प्रत्येक औषध अत्यावश्यक वस्तू कायद्यात येते
प्रत्येक औषध अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत येते. त्यामुळे जर एखादी वस्तू अत्यावश्यक असेल तर तिला डीपीसीओमधून कसे वगळता येईल, असा प्रश्न न्यायालयाने केला. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑक्टोबरला होणार आहे. या प्रकरणात तोडगा काढायला हवा. या व्यवस्थेमुळे औषध पंपन्यांना कोणताही फायदा होत नाही, असे केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱया सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.
करदात्यांवर भुर्दंड
जर एखादा रुग्ण सरकारी योजनेच्या माध्यमातून खासगी रुग्णालयात उपचार घेत असेल, तर त्यालाही दहापट जादा दराने औषध विकले जाणार. सरकारी तिजोरीतून पैसे दिले जाणार का? याचा भुर्दंड करदात्यांवर कशासाठी? असा सवालही न्यायालयाने केला.
सरकारने मागितली वेळ
केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी बाजू मांडली. सरकारला यावर तोडगा काढावा लागेल. अधिकाऱयांशी चर्चा करावी लागेल. त्यासाठी दोन आठवडय़ांची वेळ द्यावी, अशी विनंती मेहता यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करताना पुढील सुनावणी 12 ऑक्टोबरला ठेवली आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्याची मागणी यावेळी करण्यात आली.



























































