
अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशात गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ५.३ होती. भूकंप सकाळी ६:५९ वाजता झाला. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचेया नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेशात असल्याचे वृत्त आहे. हा प्रदेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपासच्या सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. हिंदुकुश-पामीर प्रदेशात वारंवार भूकंपाचे धक्के बसतात.
जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्या (German Research Center for Geosciences) अहवालानुसार, भूकंपाची खोली अंदाजे १० किलोमीटर होती. कमी खोलीवर होणारे भूकंप भूकंपाच्या केंद्राजवळ अधिक तीव्र धक्के देऊ शकतात.
हिंदूकुश प्रदेश भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सततच्या हालचालींच्या क्षेत्रात येतो. यामुळेच अफगाणिस्तान, हिंदू कुश आणि आसपासच्या पर्वतीय प्रदेशात ठराविक काळाने भूकंप होतात. सध्या, कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.




























































