अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. आरोपीने धमकी दिली तसेच आरोपी सतत पह्न करून भेटण्याचा आग्रह करत असल्याच्या आरोपाला पुष्टी देणारे मोबाईल सीडीआर तपास यंत्रणेने सादर केले नसल्याचे नमूद करत हायकोर्टाने आरोपीचा जामीन मंजूर केला.
लखन शेंडगे याच्याविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामिनासाठी त्याने अॅड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच चाळीत राहत असल्याने त्यांची ओळख होती. आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कुटुंबीयांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीकडून वारंवार पह्न करून भेटण्याचा आग्रह केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मात्र, याच वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या संघर्षानंतर गुन्हा दाखल झाला. आरोपीच्या वकिलांनी तक्रार दाखल करण्यास सहा महिन्यांचा विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आरोपीच्या वडिलांनी पीडितेच्या कुटुंबाविरोधात एनसी दाखल केल्यानंतर अर्ध्या तासाने पीडितेने गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
पोक्सो प्रकरणातील आरोपीला जामीन