
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात विरुद्ध दिशेने येणार टँकर रस्त्यातच उलटला. दुपारी 11 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे मुंबई आणि पुण्यातील नागरिक पर्यटक आणि गावी जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पर्यटकांचे यामुळे चांगलेच हाल झाले.
सुट्टय़ांची मजा घेण्यासाठी पर्यटकांनी पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, किल्ले रायरेश्वर पठारावर मोठय़ा प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे पितृ पंधरवडा असल्याने अनेक जण गावी जाण्यासाठी निघाले. मात्र आज दुपारी खंबाटकी घाटात विरुद्ध दिशेने येणार टँकर रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे पर्यटकांची चांगलीच काsंडी झाली.
वडूथ येथील पूल बंद
याशिवाय पुणे-सासवड-जेजुरी-लोणंद मार्गे सातारा जाणारी वाहतूक वडूथ येथील पुलावरून बंद करून खंबाटकी घाटाकडे वळवण्यात आली. त्यामुळे काsंडीत अधिकच भर पडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टँकर हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर हा टँकर बाजूला करण्यास पथकांना यश आले. मात्र महामार्गावरील वाहतूक उशिरापर्यंत संथगतीने सुरू होती.





























































