
राजकीय संघर्ष असावा, पण तो जीवघेणा नसावा अशा शब्दांत राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी आज सुनावले. कोणत्याही राजकीय मतभेदांमुळे कोणाचा जीव जाणे हे निंदनीय असून प्रदीप पुर्णेकर हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन पोलिसांनी सखोल व पारदर्शक तपास करावा, अशी मागणीही नाईक यांनी केली.
गणेश नाईक यांनी आज संध्याकाळी पुर्णेकर यांच्या घरी जाऊन पुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी पुर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. प्रदीप पुर्णेकर हा कोणत्या पक्षाचा होता यापेक्षा तो सामाजिक कार्यकर्ता होता. या घटनेचा खोलवर तपास होईल, खऱया गुन्हेगारांना शिक्षा होणारच आणि यात कोण सूत्रधार असतील त्यांना कायद्याच्या कक्षेमध्ये शिक्षा होईल, असे नाईकांनी पुर्णेकर पुटुंबीयांना आश्वासन दिले. तसेच शेवटी सत्य कधी तरी उजेडात येते, वरच्या दरबारात कोणी सुटत नाही. पोलीस यंत्रणेने सतर्प व्हायला हवे, असे या वेळी नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना आमची व्यथा सांगा, त्यांची भेट घालून द्या
प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी आज मानपाडा येथील पुर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांना आमची व्यथा सांगा, न्यायासाठी त्यांच्यासोबत आमची भेट घालून द्या अशी विनंती पुर्णेकर पुटुंबीयांनी भाजप नेत्यांकडे केली.

























































