हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; पहिला 3.3 तर दुसरा 4.5 रिश्टर स्केलची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात आज सकाळी ७. ४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. या धक्क्याची नोंद भूकंपमापक केंद्रावर ३.३ रिश्टर स्केल इतकी झाली आहे. त्यानंतर पुन्हा सकाळी ९.४३ मिनिटांनी जिल्ह्यात भूगर्भातून आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ४.५ अशी झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहे. सदर दुसरा धक्का हिंगोली शहर परिसरात सर्वत्र जाणवला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी घराबाहेर येत रस्त्यावर धाव घेतली होती.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अधूनमधून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दरम्यान, आज शनिवारी औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात आज सकाळी ७. ४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. भूकंपाच्या धक्क्याने गढाळा गावातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. या धक्क्याची नोंद भूकंपमापक केंद्रावर ३.३ रिश्टर स्केल इतकी झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ९.४३ मिनिटांनी जिल्ह्यामध्ये भूगर्भातून आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ४.५ अशी झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता हिंगोली शहर परिसरात सर्वत्र जाणवली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी घराबाहेर येत रस्त्यावर धाव घेतली होती. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. कोणतीही आपत्कालीन माहिती प्राप्त झाल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.