नांदेडमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के; प्रशासन सतर्क, जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नांदेड जिल्ह्यात आज शनिवार 3 ऑक्टोबर 2026 रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज सकाळी 7 वाजून 46 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावाजवळ असल्याचे समजते. ही माहिती माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 3.3 व 4.5 इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावाजवळ असल्याचे समजते. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.