बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवैधपणे मुंबईत राहणाऱया बांगलादेशी नागरिकांवर खार आणि जुहू पोलिसांनी कारवाई केली. जुहू पोलिसांनी सात आणि खार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.

नालासोपारा पूर्व येथे काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक नामदेव बेंबडे, पेडणेकर, नाईक, गायकवाड, कांबळे, चवले, खांडेकर आदींचे पथक नालासोपारा येथे गेले. त्या घरात 1 पुरुष, 4 महिला आणि 2 दोन संशयित मुले आढळून आली. अकबर अजमीर सरदार हा सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. तर रेजुका मोल्ला आणि यास्मिन मोल्ला या दोघी घरकाम करत होत्या. ताब्यात घेतलेले ते सर्व जण मूळचे बांगलादेशचे रहिवासी आहेत.

खार पोलिसांनी अवैध राहणाऱया सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. इकबाल अकबर शेख उैर्फ गौतम दत्ताच्या चौकशीत त्याने काही बांगलादेशी नागरिकांना हिंदुस्थानात आणल्यावर ओळखपत्र, रेल्वे प्रवास, राहण्यास मदत केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली. इकबालच्या घरातून एक मोबाईल, सिमकार्ड, विविध व्यक्तींच्या नावाने संशयित असलेली 20 आधारकार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत.