अर्थवृत्त – बँकांना 4 हजार कोटींचा झटका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील बँकांना 2026च्या पहिल्या तिमाहीत विदेशी मुद्रा ट्रेडिंग बुकिंगवर 50 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. हे नुकसान आरबीआयकडून करण्यात आलेल्या नियमांच्या बदलामुळे झाले आहे, असे क्रिसिल कोएलिशन ग्रीनविचच्या संसोधनातून समोर आले आहे.

आरबीआयने ऑनशोर रुपयांसंबंधी नेट ओपन पोझिशनची मर्यादा 10 करोड डॉलर ठवरली होती. बँकांना 10 एप्रिलपर्यंत आपली पोझिशन कमी करावी लागली. यामुळे ट्रेडिंग बुकिंगमध्ये बदल पाहायला मिळाला. आरबीआयने हे पाऊल अशा वेळी उचलले ज्या वेळी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये चढ-उतार सुरू होता. विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढत होते. पंपन्या मुद्रा जोखीमपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होत्या. आरबीआयने नियम लागू केल्याने बँकांना सावरण्यासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे बँकांना हा फटका बसला.

आरबीआयने 20 एप्रिलला आपले जुने निर्देश परत घेतले आणि संबंधित देवाणघेवाणीसाठी मर्यादित सूटची परवानगी दिली. यामुळे बँकांवर होणार दबाव काही प्रमाणात कमी झाला. आरबीआयने घेतलेल्या निर्णयामुळे ट्रेडिंग धोरणात अचानक बदल झाल्याने विदेशी मुद्रामध्ये बँकांना नुकसान सोसावे लागले, असे आमीर हजारीया यांनी म्हटले.

किमती ज्वेलर्स

किमती ज्वेलर्सने मुंबईतील बोरिवली (पश्चिम) येथे आपले दुसरे भव्य दालन सुरू केले आहे. संस्थापक अरमान कोठारी यांच्या नेतृत्वात ब्रँडने वेगाने विस्ताराचे उद्दिष्ट ठेवले असून डिसेंबर 2026पर्यंत एकूण 88 नवी दालने उघडण्याचे पंपनीचे लक्ष्य आहे.

पारस डेअरी 

‘पारस डेअरी’ने मुंबईतील अनुगा सिलेक्ट इंडियामध्ये गॅलेसिया क्रीम चीज लाँच केले. क्रीम चीजचे उपयोग पारंपरिक स्प्रेडच्या पलीकडे बेकरी आणि फूड-सर्व्हिस स्वरूपांच्या विस्तृत श्रेणीमध्ये विस्तारत असतानाच हे लाँच झाले आहे.

‘अजय’स पॅफे मुंबईत 

‘अजय’स पॅफेने महाराष्ट्रातील आपले पहिले आउटलेट नालासोपारा येथे सुरू करत मुंबईच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून ब्रँडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2,500 ग्राहकांनी आउटलेटला भेट दिली.

सेल्सफोर्सची भागीदारी

सेल्सफोर्ससोबत केएल विद्यापीठाने भागीदारीची घोषणा केली आहे. याअंतर्गत ‘टेबलो लॅब’ सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये डेटाविषयी समज, अॅनालिटिक्सचा विचार करण्याची पद्धत आणि एआय कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जेएसडब्ल्यूची नव्या क्षेत्रात एंट्री

जेएसडब्ल्यू समूहाने एम्प्स्टार हा नवीन ब्रँड लाँच केला आहे. या ब्रँड अंतर्गत जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने देशात इलेक्ट्रिक बस आणि ट्रक लाँच केले आहे. या वेळी जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल, पार्थ जिंदाल उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केले आहे. एम्प्स्टर केवळ वाहनांची निर्मितीच करणार नाही तर चार्ंजग सुविधा, ऑपरेटिंग सोल्युशनची सेवा देणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील प्रकल्पात एम्प्स्टार वाहनांची निर्मिती केली जाणार आहे.

महाराजाची कॉन्फिडन्स आणि कस्तुरी अगरबत्ती मार्पेटमध्ये   

महाराजा अगरबत्तीची काँफिडन्स आणि कस्तुरी प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तसेच केसरिया उद, केसरिया चंदन, मिस्टीक रोझस टॅपल ब्लिस, रॉयल उद, हिना, पानडी, सुखद सँडल, पल्सर, बेला, कॉन्फिडंट, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवूड, स्वामी, ग्रीन मस्क, कशमिरी लव्हेंडर, अंगारे उद, कस्तुरी आणि अनमोल अशा प्रकारातील उत्तम सुगंधी अगरबत्त्या, महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी.व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. 8369185071वर संपर्क साधा.

करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात 

बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती साईरथ आणि व्हाईट सेज अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. पंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बंगळुरू पंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. संपर्क – 9343834805

अॅरोकेम रतलामचा अल्कोहॉल फ्री डिओ  

अॅरोकेम रतलाम प्रा.लि.ने आईस ब्ल्यू अल्कोहोल फ्री डिओ नवीन पॅकमध्ये बाजारात आणले आहे. या डिओचा सुगंध अत्यंत उत्तेजक, दर्जेदार आणि टवटवीत करणारा आहे. हा डिओ अत्यंत मनमोहक आहे. या डिओच्या 200 मिलीची किंमत 200 रुपये आहे. फॅशन, एचटूओ,  ब्लू स्टार, ब्लॅक ऊथ, अॅरो मॅग्नेट हे इतर प्रकारचे उपलब्ध असलेले अल्कोहोल फ्री डिओ बाजारात उपलब्ध आहेत. संपर्क – 07412-236226

स्टील उद्योगात हिंदुस्थान मजबूत 

इंडियाचा विस्तारत असलेला स्टील उद्योग देशांतर्गत फेरो-अलॉय क्षेत्रासाठी वाढीची नवी संधी निर्माण करत आहे आणि जागतिक बाजारपेठांमध्ये इंडियाचे स्थान मजबूत करण्याची संधी देत आहे, असे इंडियन फेरो अलॉय प्रोडय़ुसर्स’ असोसिएशनने 6व्या इंटरनॅशनल फेरो अलॉयज कॉन्फरन्समध्ये सांगितले. इंडियाने वापराच्या बाबतीतही एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.