उंबरवाडी आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी, महिलांना मदतीचा हात; मुंबई पोर्ट प्राधिकरणातील गोदी कामगारांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोर्ट प्राधिकरणातील गोदी कामगारांच्या वतीने कर्जतच्या उंबरवाडी आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांना मदतीचा हारा देण्यात आला. विद्यार्थ्यांना ६५ इंची इंटरअॅक्टिक डिजिटल बोर्ड भेट दिला. त्यामुळे त्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली असून शैक्षणिक साहित्यही भेट दिले. माता-भगिनींना साडी चोळीचे वाटत केल्यानंतर प्रामस्थांना स्नेहभेजन दिले. या उपक्रमाच्या निमित्ताने कामगारांनी उंबरवाडीतील आदिवासर्सीच्या सोबत स्नेहाचे नाते जोडले आहे.

हा उप्रक्रम राबवण्यासाठी सूर्यकांत शिंदे, नीलकंठ जाधव, सुहास बाबर यांनी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी उंबरवाडीमधील आदिवासीच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद घनकुटकर, तरुण भोगले, धनंजय कुमठेकर, अमोल म्हात्रे, गणेश भगत, विलास कांबळे, संदीप कदम, संतोष गमरे, महेंद्र पारकर, सुहास पारकर, संजय तावडे, राजेश म्हात्रे, विनोद देवरे, संजय अरगडे, ज्ञानेश्वर गायकवाड, विनोद कुबल, मिलिंद कोयंडे आणि यशवंत गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्थानिकांचे सहकार्य 

उंबरवाडीचे शिक्षक दिनेश शिंगवा व हरिभाऊ दहिफळे, वाघिणीची वाडी येथील देवानंद इले, चिंचेवाडी येथील रतीलाल भोई, झेंडेवाडी येथील सोळसे सर, कर्जत पंचायत समिती सदस्या रेश्मा जोशी तसेच पोशिरेचे माजी सरपंच हरिचंद्र निरगुडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उंबरवाडी ग्रामस्थ मधुकर गिरा, गणपत भगत, मधुकर पारधी, भाऊ मधे, गणपत पारधी, कालीबाई मेंगाळ, पुंडलिक गिरा आणि ‘जय हनुमान क्रीडा मंडळ, उंबरवाडी’ यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.