हॉर्न वाजवल्याच्या रागातून एसटी बसची तोडफोड; चाकणमध्ये भाईगिरीचा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी बस चालकाने हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका कारमधील माथेफिरूने मुंबईच्या दिशेने जाणाऱया एसटी बसची भर रस्त्यातच तोडफोड केली. चाकण एसटी स्थानकाजवळ घडलेल्या या थरारक प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले.

कुणाल डफळ (30) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. बस चालक अशीफ पटेल (49) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एसटी बस चाकण स्थानकावरून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. चाकण-तळेगाव रस्त्यावर बसचालक पटेल यांनी हॉर्न वाजवला. याचा राग अनावर झाल्याने पुढे असणाऱ्या कारमधील डफळ याने भररस्त्यात बस अडवली. हातातील लोखंडी रॉडच्या सहाय्याने त्याने बसच्या समोरील भागावर आणि खिडक्यांच्या काचांवर जोरदार प्रहार करत त्या पह्डून टाकल्या.